केजरीवालांनी कथन केली केंद्राच्या दडपशीहीची कहाणी

शाळा, रूग्णलयाच्या इमारतीही बांधु दिल्या नाहीत

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनच्या निमीत्ताने दिल्ली सरकारच्यावतीने येथील छत्रसाल स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सरकारवर केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या दडपशाहीची कहाणी ऐकवली. ते म्हणाले की दिल्लीकरांसाठी शाळा, रूग्णालये बांधायलाही आम्हाला प्रतिबंध करण्यात आला. मोहल्ला कमिट्या सुरू करण्यातही आम्हाला अडचण आणण्यात आली. केंद्राने आमच्या सरकारच्या कामात आणलेले हे विघ्न म्हणजे देशाचाच विश्‍वासघात होता असेही केजरीवालांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की पुर्वी ब्रिटीशांचे हस्तक म्हणून काही लोक काम करीत आणि ते क्रांतीकारांच्या कामात अडथळे आणित तसाच प्रकार आजही देशात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मी जर दिल्लीत शाळा, रूग्णायांच्या इमारती बांधू इच्छित होतो आणि मोहल्ला क्‍लिनीकसह अन्य सुविधा उपलब्ध करून देत होतो तर मी काय चूक करीत होतो असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला. ते म्हणाले की आम्ही दिल्लीतील जो कोणी जवान देशाचे रक्षण करताना शहीद होईल त्याच्या कुटुंबियांना एक कोटी रूपयांची मदत देण्याची घोषणा आमच्या सरकारने आखली होती पण ही योजनाही आम्हाला राबवू दिली गेली नाही यासारखे दुर्देव नाही असे ते म्हणाले. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानाच्या मदतीत पक्षीय राजकारण आणण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी मोदी सरकारला केला. हा देशाचा विश्‍वासघात नाही तर आणखी काय असा सवालही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)