केजरीवालांच्या मंत्र्याच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी

नवी दिल्ली – दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांच्या विविध ठिकाणांवर आज आयकर विभागाने छापे मारले. कर चुकवेगिरीच्या संशयावरून हे छापे मारण्यात आल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. तर आयकर विभागाला हाताशी धरून मोदी सरकार आम्हाला नाहक त्रास देत असल्याचा आरोप पक्षानी केला आहे.

कैलास गहलोत हे व्यावसायिक असून त्यांच्या वसंत कुंज आणि डिफेन्स कॉलनी भागातील घरांवर तसेच पश्‍चिम विहार, नजाफगंज, लक्ष्मीनगर, पालम विहार आणि गुडगाव येथील व्यावसायिक ठिकणांवर छापे मारण्यात आले आहेत. गहलोत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या दोन कंपन्या आहेत. ब्रिस्क इन्फ्रास्ट्रक्‍चर अॅन्ड डेव्हलपर्स प्रा. लि आणि कॉर्पोरेट इंटरनॅशनल फायनान्शीयल सर्व्हिसेस अशा दोन कंपन्यांच्या कार्यालयांमधील कागदपत्रांची तपासणी या छाप्यामध्ये करण्यात आली. या कंपन्यांचे हिशोब आयकर खात्याकडे सादर करण्यात आला आहे त्याविषयी शंका निर्माण झाल्याने हे छापे मारण्यात आले आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)