केजरीवालांच्या दरबारात तरुण पोहोचला जिवंत काडतुसांसह

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर  मिरची  पुडने हल्ला झाल्याचे प्रकरण ताजेच असताना पुन्हा एकदा केजरीवालांच्या सुरक्षेत चूक झाली आहे. केजरीवालांच्या जनता दरबारात आज एका तरुणाला पिस्तुलातील जिवंत काडतुसे सापडल्याने अटक करण्यात आली आहे. मोहम्मद इमरान असे तरुणाचे नाव आहे.

माहितीनुसार, मोहम्मद इमरानसह १२ अन्य मौलवीही सोबत होते. दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी, अशी शिफारस करण्यासाठी ते जनता दरबारात गेले होते. यावेळी इमरानकडे जिवंत काडतुसे सापडल्याने सुरक्षा रक्षकांनी त्याला अटक केले.  इमरानकडे चौकशी केली असता त्याने सांगितले कि, मस्जिदच्या दानपेटीत ही काडतुसे मिळाली होती. ते काढून मी माझ्या बॅगेत ठेवले. परंतु, मुख्यमंत्र्यांना भेटायला येताना ती काडतुसे काढण्यास विसरलो, असे आरोपी तरुणाने सांगितले.

-Ads-

दरम्यान, याआधी अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्‍तीने मिरची पूड फेकली. दिल्ली सचिवालयातील केजरीवाल यांच्या कार्यालयाबाहेरच हा हल्ला करण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)