केजरीवालांची शुक्रवारी पोलिस चौकशी

नवी दिल्ली – दिल्लीच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आलेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणात येत्या शुक्रवारी दिल्ली पोलिस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहेत. त्यांना तशी नोटीस पाठवण्यात आली असून त्या दिवशी अकरा वाजता ही चौकशी केली जाईल अशी माहिती एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणात पोलिसांनी या आधी 11 आमदारांची चौकशी पुर्ण केली आहे.

दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना 19 फेब्रुवारी रोजी रात्री मुख्यमंत्र्यांच्या समोरच आम आदमी पक्षाच्या आमदारांनी धक्काबुक्की करीत धमक्‍याही दिल्याची तक्रार मुख्य सचिवांनी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हेही तिथे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची औपचारीकता बाकी असून ती पुर्ण झाली की या प्रकरणी रितसर खटला दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)