केंब्रिज ऍनालिटीका 2003 पासून भारतात कार्यरत

कंपनीची नियुक्‍ती कॉंग्रेसने केली, माजी कर्मचाऱ्याचा गौप्यस्फोट

लंडन – डाटा लीक प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या केंब्रिज ऍनालिटीका या कंपनीने भारतामध्ये भरपूर काम केले असून कॉंग्रेस पक्षानेच या कंपनीची नियुक्‍ती केली होती, असा गौप्यस्फोट या कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे. भनावट बातम्यांच्या प्रकरणी इंग्लंडच्या संसदीय समितीकडून तपास सुरू आहे. त्या तपासादरम्यान या कर्मचाऱ्याने ही माहिती उघड केली आहे.

ख्रिस्तोफर वायल असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हाऊस ऑफ कॉमन्सच्या डिजीटल, कल्चर, मिडीया ऍन्ड स्पोर्ट (डीसीएमएस) कमिटीपुढे त्याने ही माहिती दिली. फेसबुकच्या आधारे केंब्रिज ऍनालिटीका या ब्रिटीशने डाटा लीक केल्याचा आरोप आहे. या कंपनीने भारतातील निवडणूक प्रक्रियांवर प्रभाव टाकण्याचा प्रभाव केल्याचाही आरोप आहे.
“फेसबुक’चे सर्वाधिक वापरकर्ते भारतातच आहेत. तसेच भारतातच वेगवेगळे राजकीय मतप्रवाह आहेत. तसेच राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी कारवायाही केल्या जात असतात, असे मजूर पक्षाचे खासदार आणि संसदीय समितीचे सदस्य पॉल फेरेली यांनी चौकशीदरम्यान म्हटल्यावर वायल याने केंब्रिज ऍनालिटीकाच्या भारतातील कामासंदर्भातील माहिती दिली. कंपनीने भारतात खूप काम केले आहे. कॉंग्रेस पक्षासाठीच हे काम केल्याचे आपण समजतो. कॉंग्रेससाठी कंपनीने सगळ्या प्रकारचे प्रकल्प केले.

एखादा राष्ट्रीय प्रकल्प केल्याचे आपल्याला आठवत नाही. मात्र प्रादेशिक पातळीवर अनेक प्रकल्प केले होते. भारत खूप मोठा देश आहे. ब्रिटनच्या आकाराचे अनेक प्रांत भारतात आहेत. तेथे कंपनीची कार्यालये आणि कर्मचारीही आहेत, असे वायल यांनी सांगितले.

भारतामध्ये नव्याने तणाव वाढायला नको, यासाठी भारताशी संबंधित कागदपत्रे संसदीय समितीला देण्याची तयारीही वायलने दर्शवली आहे.

केंब्रिज ऍनालिटीकामधील पूर्वीच्या कर्मचाऱ्यांनी 2014 मध्ये फेसबुकवरील प्रश्‍नावलीच्या माध्यमातून 50 दशलक्ष लोकांची माहिती गोळा केल्याचा आरोप वायल यांनी केला आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या काळात या डाटाचा उपयोग प्रचारादरम्यान झाल्याचाही संशय आहे.

ब्रिटनच्या संसदीय समितीपुढे साक्ष देण्यास फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र झुकेरबर्ग यांनी त्यास नकार दिला आहे. मात्र फेसबुकचे काही पदाधिकारी या समितीपुढे साक्ष देणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)