केंब्रिज ऍनालिटीकाच्या लंडनमधील कार्यालयावर छापे

लंडन – “फेसबुक’मधून डाटा चोरीला जाण्याच्या प्रकरणी केंद्रस्थानी असलेल्या केंब्रिज ऍनालिटीकाच्या लंडनमधील कार्यालयांवर ब्रिटीश नियामकांनी आज छापे घालण्यात आले. आज पहाटेच्या पूर्वी हे छापे घालण्यात आले. तपासाची पुढील पावले उचलण्यापूर्वी उपलब्ध झालेल्या पुराव्यांची छाननी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

न्यायालयाकडून तपासाचे वॉरंट मिळवल्यावर माहिती आयोगाच्या 18 अधिकाऱ्यांनी लंडनमध्ये केंब्रिजच्या कार्यालयांवर छापा घातला होता. रात्री 8 च्या सुमारास सुरू झालेली तपासाची कारवाई पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू राहिली, असे माहिती आयोगाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

तपासाची पुढची दिशा ठरवण्यापूर्वी उपलब्ध पुराव्यांचे विश्‍लेषण करावे लागेल. “आयसीओ’कडून केल्या जात असलेल्या मोठ्या तपासाचा हा एक भाग आहे. व्यवसायिक कलाकार, सोशल मिडीया, राजकीय पक्ष, राजकीय प्रचारामध्ये हेरगिरी करून मिळवलेल्या पर्सनल डाटाचा वापर झाला होता का, हे या छाप्यांदरम्यान तपासण्यात आले.

केंब्रिज ऍनालिटीका या कंपनीने 2016 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये “फेसबुक’मधून चोरलेल्या माहितीचा प्रचारासाठी गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून “फेसबुक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरीही व्यक्‍त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)