‘केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण : मार्क झुकेरबर्ग यांनी मान्य केली चूक

न्यूयॉर्क : केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणाबाबत अखेर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी मौन सोडले आहे. आमच्या हातून काही चुका झाल्या आहेत. पण त्या सुधारण्यासाठी आम्ही उपाययोजना देखील राबवल्या आहेत, असे झुकेरबर्ग म्हणाले. पुन्हा असे प्रकार होणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले.

झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पावले उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे. झालेल्या प्रकरणांतून आम्ही आमच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आणि पुन्हा तुमचा विश्वास संपादीत करू’

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीला फेसबुकवरील पाच कोटी युजर्सचा तपशील दिल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी झुकेरबर्ग यांना ब्रिटनच्या संसदीय समितीने समन्सही बजावले आहे. युजर्सच्या परवानगीविना त्यांचा डेटा उघड केल्याने फेसबुकवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर झुकेरबर्ग यांनी त्याच्या अधिकृत पेजवरुन केंब्रिज अॅनालिटिका वादावर सविस्तर भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले आहे.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)