केंद्र सरकार न्यायालयापुढे करणार आधारचे पॉवर पाईंट प्रेझेंटेशन

सर्वोच्च न्यायालयाकडे मागीतली अनुमती
नवी दिल्ली – सरकारच्या आधार कार्ड योजनेची नेमकी माहिती न्यायालयापुढे पोहोचवण्यासाठी न्यायाधिशांच्या पुढे त्याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे सध्या आधार कार्डाच्या वैधतेला देण्यात आलेल्या अनेक आव्हान याचिकांची सुनावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने भारत सरकारच्या युनिक आयडेंटिफीकेशन ऍथॉरिटीच्या सीईओ मार्फत पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन सादर केले जाणार आहे. त्यासाठी न्यायालयाची अनुमती मागण्यात आली आहे.

आधार कार्डाच्या संबंधात अनेक आक्षेप आहेत. त्याचा डाटा सुरक्षित नाही, काही जणांना या कार्डाच्या अभावी सरकारी लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे वगैरे आक्षेप या बाबतीत घेण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सरकारला काही बाबी न्यायालयापुढे स्पष्ट करायच्या आहेत त्यामुळे हे पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन करण्याची सरकारची योजना आहे. ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी न्यायालयाला ही बाब सांगितली आहे. आधार योजनेच्या संबंधातील तांत्रिक बाबी अधिक स्पष्टपणे सांगण्यासाठी युआयडीएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना येथे पाचारण करण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)