केंद्र सरकारी अनुभवी डॉक्‍टरांच्या बदल्या होणार

आरोग्य उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली – केंद्र सरकारी तसेच केंद्र सरकारच्या संस्थांमधील अनुभवी डॉक्‍टरांना शिक्षण, क्‍लिनिकल/सार्वजनिक आरोग्य उपक्रमांच्या अंमलबजावणीतील बदल्या करण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय आरोग्य सेवा आणि इतर मंत्रालये/विभाग/केंद्र सरकारच्या संस्थांमधल्या डॉक्‍टरांनी 62 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय सेवेत आपली हातोटी असणाऱ्या क्षेत्रात विशेषत्वाने काम करावे यासाठी हा निर्णय आहे.

यासाठी 15 जून 2016 ला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयात सुधारणा केली जाईल. जेणेकरुन हा निर्णय प्रभावीपणे अंमलात आणतांना अनुभवलेल्या अडचणींवर तोडगा काढता येईल.

यामुळे वैद्यकीय शिक्षण, क्‍लिनिकल, रुग्ण सेवा आणि राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अधिक अनुभवी डॉक्‍टर उपलब्ध होतील तसेच अधिकाधिक केंद्र सरकारी डॉक्‍टरांमध्ये नेतृत्व विकास आणि क्षमता बांधणी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)