केंद्र सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

कोपरगाव – केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक व सामाजिक परिस्थिती खालावली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महात्मा गांधींनी आपल्या जीवाचे बलिदान करून मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्‍यात आले आहे, असा आरोप करीत गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी मौनव्रत धारण करून निषेध आंदोलन केले.
देशाचा व राज्याचा कारभार अतिशय चुकीच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पारतंत्र्यात असल्यासारखे वाटते आहे. देशाच्या संविधानाचा वारंवार अपमान होत असून या व्यक्तींवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. विचारवंतांच्या दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्या. या हत्येतील आरोपींना पाठीशी घातले जात आहे. राफेल विमानांच्या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. अनेक चुकीच्या पद्धतीने राज्य व देशाचा कारभार सुरू असून त्याचा मौनव्रत धारण करून निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या वेळी सांगितले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, विजयराव आढाव, युवकचे अध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, अजीज शेख, गोरक्षनाथ जामदार, दिनार कुदळे, फकीरमामू कुरेशी, हिरामण गंगुले, कृष्णा आढाव, विकास बेंद्रे, निखील डांगे, बाळासाहेब रुईकर, बापू वढणे, ऋषिकेश खैरनार, बाला ंगंगुले, वाल्मिक लहारे, संदीप कपिले, रवी राऊत, गणेश लकारे, अंबादास वडांगळे, राहुल देवळालीकर, दिनेश पवार, समीर वर्पे, नितीन त्रिभुवन, तेजस साबळे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)