केंद्र सरकारकडून “मॉडर्न’चा सन्मान

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाने ऐकू येऊ शकणारे संकेतस्थळ कार्यान्वित करण्याचा उपक्रम देशात वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. त्याची दखल केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने घेत, दिव्यांग दिनाच्या निमित्ताने देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महाविद्यालयास पुरस्कार देऊन सन्मान केला.

मॉडर्न महाविद्यालयाने दृष्टिहीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरील प्रवेश, परीक्षा आणि उपक्रम अशी महत्त्वपूर्ण माहिती कळावी, यासाठी अभिनव यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे दृष्टिहीनांना महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणारी माहिती ऐकता येत आहे. तसेच संकेतस्थळावर ऑडिओ ऑउटपुटची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यामुळे महाविद्यालयाचे संकेतस्थळ दृष्टिहीनांना उपयुक्‍त ठरत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्‍तीच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. त्यातील “बेस्ट ऍक्‍सेसेबल बेवसाईट’चा पुरस्कार महाविद्यालयाला मिळालेला आहे.

हा पुरस्कार नवी दिल्ली येथे महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी स्वीकारला. त्या म्हणाल्या, दृष्टिहीनांना महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर माहिती होणे आवश्‍यक आहे. त्याचा विचार करून महाविद्यालयाने अभिनव संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. हे संकेतस्थळ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आले आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या पुढाकारातून आणि प्राचार्य राजेंद्र झुंजारराव यांच्या प्रयत्नातून मॉडर्न महाविद्यालयास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. संगणक विज्ञान विभागाच्या सहाय्यक प्रा. डॉ. अंजली सरदेसाई यांनी वैशिष्ट्यपूर्ण संकेतस्थळासाठी अथक परिश्रम घेतले असल्याचे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)