केंद्र-आरबीआय वाद संपुष्टात येणार? उर्जित पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट 

नवी दिल्ली –  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यात आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून दोघांमध्ये चर्चा झाली आहे.  या चर्चेत एका फॉर्म्युलावर दोघांचेही एकमत झाल्याचे समजत आहे.

या फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकार आरबीआयकडून पैसे मागण्यासंदर्भात नरमाईची भूमिका घेणार आहे, तर आरबीआयही केंद्राला कर्ज देण्यात थोडी सूट देणार आहे. या फॉर्म्युल्यांतर्गत आरबीआय काही बँकांनी करेक्टिव अॅक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून बाहेर काढणार आहे. जेणेकरून बँक अधिक कर्ज देऊ शकेल.

काय होता केंद्र आणि आरबीआय वाद –
रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतून मोठा हिस्सा मिळवण्याचा सरकारचा होता. तसेच बँकांच्या कर्ज वितरणावर आणलेले निर्बंध दूर करावेत, असेही सरकारचे म्हणणे आहे. तसेच केंद्र सरकारने आजवर कधीही वापरात न आलेल्या रिझर्व्ह बँक कायद्याचा कलम ७(१) चा वापर करण्याची भूमिका घेतल्याने तणाव टोकाला गेला होता. उर्जित पटेल हे गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार अशीदेखील चर्चा सुरु झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)