केंद्र आणि राज्य शासनाचा ग्रामविकासावर मोठा भर- पंकजा मुंडे

मुंबई: यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी गौरव समारंभ रविंद्र नाट्य मंदिर येथे आज झाला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासन ग्रामविकासावर मोठा भर देत आहे. राज्यात विविध आवास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते अडीच लाख घरांचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय जागा नसलेल्या ग्रामस्थांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे. शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमीत करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व योजनांमधून संपूर्ण महाराष्ट्र राज्य बेघरमुक्त करण्याचे स्वप्न साकार होत आहे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्यात ग्रामविकासाची कामे चांगली होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले जाहीर सभेत कौतुक केले. पण प्रत्यक्षात गावागावात काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांच्या श्रमाचे हे फळ आहे. त्यांच्या योगदानातूनच राज्यात ग्रामविकास गतिमान होऊ शकला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

चौदाव्या वित्त आयोगाचा 100 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. यामुळे गावांना विकासाचे नियोजन करणे सुकर झाले आहे. आपले सरकार सेवा केंद्रच्या माध्यमातून गावातच सर्व सेवा उपलब्ध होत आहे. जनतेतून थेट सरपंचांची निवड होत असल्याने गावांच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक खेडे, वाड्या, तांडे मुख्य रस्त्यांनी जोडले गेल्याने ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली आणि महिलांना अस्मिता योजनेतून किफायतशीर दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महिला बचतगट उत्पादित मालाला आंतरराष्ट्रीय बाजरपेठ मिळवून देण्यासाठी अँमेझॉनशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. महिला बचतगटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुमतीबाई सुकळीकर महिला उद्योगिनी योजना सुरु करण्यात आली आहे. अशा विविध योजनांमधून मागील चार वर्षात ग्रामविकासाच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला मोठी गती देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)