केंद्र आणि राज्यात ठोकशाहीचे सरकार : अशोक चव्हाण 

जनतेने लोकशाहीवर विश्वास ठेवणारे सरकार आणावे

गडचिरोली: केंद्रात आणि राज्यातील सरकारे ही लोकशाही नव्हे, तर ठोकशाहीची आहेत. हे उन्मत्त सरकार आता पत्रकार, साहित्यिकांच्या लिखाणावही बंदी घालत आहे. भाजप ठोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काजीब करण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणघणात प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केला. जतनेते हा प्रयत्न हाणून पाडत लोकशाहीवर विश्वास ठेवणारे सरकार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चव्हाण म्हणाले, कॉंग्रेसच्या कार्यकाळात जेवढी कामे झाली, तेवढी कामे आजपर्यंत कोणीच केली नाहीत. उलट आमच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे हळूहळू ठप्प पडली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सुरजागडमधील लोहखनिज दुस-या जिल्ह्यात जात आहे. स्थानिक लोक मात्र रोजगारात मागे पडत आहेत. मात्र या सरकारला त्याची काळजी नाही.

आदिवासींना आरोग्य सुविधा मिळत नसलयाने कुपोषणाने मुले मरत आहे. याचे सरकाराला काही देणे-घेणे नाही. सत्ताधारी उन्मत्तपणे “मरता है, तो मरने दो’ असे म्हणतात. सिंचनाची कामे रखडली, कर्जमाफी जाचक अटींमध्ये अडकवून ठेवली. भाजप आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. “आपण दोघे भाऊ, मिळून वाटून खाऊ’ अशा भूमिकेतून सत्ता उपभोगणा-या या दोन्ही पक्षांना आता खाली उतरवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)