केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केली मोर्णा नदीची पाहणी

अकोला : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी आज मोर्णा नदीला भेट दिली. लोकसहभागातून मोर्णा नदीचा झालेला कायापालट पाहून अहीर भारावून गेले. मोर्णा नदीच्या या यशस्वी मोहिमेबद्दल त्यांनी यावेळी जनतेचे तसेच पालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनाचे कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले. अशा प्रकारची मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविली गेली पाहिजे, असे मतही  त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सामुहिक विवाह सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री  अहिर आज शहरात आले होते. या निमित्ताने त्यांनी आज मोर्णा नदीला भेट देण्याचा मनोदय व्यक्त केल्यानंतर गणेश घाट व अनिकट परिसरातून वाहणाऱ्या मोर्णा नदी काठाची त्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, माजी आमदार जगनाथ ढोणे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, तहसीलदार राजेश्वर हांडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहिम कशा प्रकारे यशस्वीरित्या राबविण्यात आली याची सविस्तर माहिती याप्रसंगी त्यांनी घेतली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)