केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

सीतामढी: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वादंग सुरू झाल्या आहे. त्यातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. याबाबत त्यांच्या विरोधात बिहारमधील सीतामढी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेशाने वकील असलेल्या ठाकूर चंदन सिंग यांनी स्मृती इराणी यांच्यासह महिलांना मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

ठाकूर सिंह यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, इराणी यांनी संपूर्ण महिलावर्गाला अपवित्र संबोधने योग्य नाही. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्यात यावा, असा निर्णय दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देशात गाजत असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी आल्यानंतर तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल? असा सवाल केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिकांचा विरोध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)