केंद्रीय मंत्री पासवान यांच्या कुटूंबातील कलह चव्हाट्यावर

कन्या किंवा जावई विरोधात लढवणार निवडणूक?
पाटणा – केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) प्रमुख रामविलास पासवान यांच्या कुटूंबातील कलह चव्हाट्यावर आला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पासवान यांच्या विरोधात त्यांच्या कन्या किंवा जावई रिंगणात उतरतील, अशी शक्‍यता बळावली आहे.

पासवान यांचे जावई अनिल साधू यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सासऱ्यांविरोधात बंडाचे निशाण फडकावले. लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने (राजद) उमेदवारी दिल्यास पासवान किंवा त्यांचे पुत्र चिराग यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवण्यास स्वत: किंवा पत्नी आशा तयार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पासवान पिता-पुत्रांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

लोजपकडून दलितांना गुलामांसारखी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे दलितांमध्ये पासवान यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. पासवान केवळ पुत्राच्या पाठिशी उभे आहेत. मात्र, त्यांनी मुलींकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. कौटूंबिक कलहामुळे नव्हे; तर आमच्या मान-सन्मानासाठी आम्ही पासवान यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आशा या पासवान यांच्या पहिल्या पत्नीच्या कन्या आहेत. त्यांचे पती साधू अनेक वर्षांपासून पासवान यांच्या दलित सेनेमध्ये कार्य करत आहेत. त्यांनी लोजपच्या तिकिटावर 2015 मधील बिहार विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागले. साधू हे माजी आमदार पुनित राय यांचे पुत्र आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)