केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन 

बंगळुरू –  केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांचे कर्करोगाने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. कर्नाटकाच्या बसवानागुडी येथील श्री शंकर कँसर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच अनंतकुमार यांची प्रकृती खालावत गेली आणि रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

अनंतकुमार दक्षिण बेंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. १९९६ पासून या मतदारसंघातून ते सहावेळा निवडून आले. केंद्रीय मंत्रिमंडळात २०१४ पासून अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते मंत्री म्हणून पदभार देण्यात आला होता. त्यानंतर जुलै २०१६ पासून त्यांच्याकडे संसदीय कार्य मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली होती.

-Ads-

दरम्यान, अनंतकुमार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)