केंद्रीय मंत्री अनंतकुमार अनंतात विलीन 

बंगळुरू – दिवंगत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कामराजपेटे येथील स्मशान भूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या असंख्य समर्थकांनी गर्दी केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भाजप अध्यक्ष अमित शहा, प्रदेश भाजप अध्यक्ष येडियुरप्पा, संघाचे सरचिटणीस भय्याजी जोशी इत्यादी यावेळी उपस्थित होते.

अन्य केंद्रीय मंत्र्यांपैकी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, पीयुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, महेश शर्मा, विजय गोयल, सदानंद गौडा हेही यावेळी उपस्थित होते. काल रात्रभर त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या प्रदेश मुख्यालयात तो काहीं काळ ठेवण्यात आला होता. लष्कराच्या तिन्ही सेनादलांच्यावतीने त्यांना एकत्रितपणे अखेरची मानवंदना देण्यात आली. अनंतकुमार हे 1996 पासून दक्षिण बंगळुरू मतदार संघातून सहावेळा लोकसभेवर निवडून गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)