केंद्राने हुर्रियत नेत्यांशी चर्चा करावी – अब्दुल्ला

कोलकाता: जम्मू काश्‍मीरात टिकाऊ शांतता प्रस्थापित करायची असेल तर चर्चेच्या माध्यमातूनच ती करता येऊ शकेल आणि त्यासाठी केंद्र सरकारने तेथील हुर्रियत नेत्यांशी चर्चा केली पाहिजे अशी सुचना नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे. ते म्हणाले की लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी असे विधान केले आहे की कोणतीही पुर्व अट न घालता तालिबानशीही चर्चा केली जाऊ शकते तर अन्य कोणाशीही चर्चा करण्यात अडचण नाही. असे जर असेल तर आता केंद्र सरकारने काश्‍मीर प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी हुर्रियत नेत्यांशी चर्चा केली पाहिजे.

हुर्िर्रयत नेते हे भारतीय आहेत आणि त्यांच्याकडे भारत सरकारचा पासपोर्ट आहे. या आधी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनेही त्यांच्याशी चर्चा केली होती मग विद्यमान केंद्र सरकारला त्यांच्याशी चर्चा करण्यास काय अडचण आहे असा सवाल त्यांनी केला. लष्करी बळाचा वापर करून काश्‍मीरात शांतता प्रस्थापित होणे कदापिही शक्‍य नाहीं असे त्यांनी आज येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)