केंद्राने मागविली आगीच्या घटनांची आकडेवारी

पिंपरी – केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यात घडलेल्या आगीच्या घटनांची आकडेवार राज्य सरकारकडून मागविली आहे. याची दखल घेत, राज्य सरकारच्या अग्निशमन सेवा संचालनालाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व विशेष प्राधिकरणांकडून या घटनांची माहिती मागविली आहे.

केंद्र सरकारकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशमन सेवेतील तुट भरुन काढण्यासाठी व अग्निशमन सेवेच्या सक्षमीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्याकरिता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष प्राधिकरणांमध्ये अस्तित्वात असलेल्या अग्निशमन यंत्रणेची माहिती जमा केली जात आहे. यामध्ये उपलब्ध वाहने, उपकरणे, व मनुष्यबळ यांचा आढाव घेतला जात आहे.

दरम्यान, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ही माहिती वेळेवर उपलब्ध करुन दिली जात नसल्याने, याचा एकत्रित अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविताना राज्याच्या अग्निशमन संचालनालयाला अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेत, राज्यातील या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील दोन वर्षांच्या कालावधीतील आगीच्या घटनांची माहिती संकलीत करण्याचे काम अग्निशमन संचालनालयाकून सुरु आहे. या आगींच्या घटनांमध्ये झालेली जिवितहानी व वित्तहानीची माहिती देणे आवश्‍यक आहे.

“त्या’ नगरपालिकांचा मागविला अहवाल
अग्निशमन सेवा उपलब्ध नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्याचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकसंख्या, झालेल्या घटनांची आकडेवारी यांची माहिती मागविण्यात आली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारच्या अनुदानातून अग्निशमन यंत्रणा देता येईल, याचा आढावा घातला जाणार आहे. तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना यापुर्वीच केंद्र सरकारचे अनुदान देण्यात आले आहे., त्याचा प्रगती अहवाल देखील मागविला आहे. आगीची घटना घडल्यास काय उपाययोजना केली जाते, याची देखील माहिती मागविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)