केंद्राच्या निर्णयाने शिक्षणसंस्थांना मोठी चपराक

संग्रहित छायाचित्र

यूजीसीने घेतलेल्या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

पुणे – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्याने सर्वत्र स्वागत होत आहे. या निर्णयाने मूळ गुणपत्रिका स्वत:कडे ठेवत विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शिक्षणसंस्थांना मोठी चपराक बसणार आहे. प्रवेश रद्द करतानाही नियमावली निश्‍चित केल्याने विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क मिळणार असल्याने शिक्षण संस्थांवर मोठा अंकुश बसणार आहे.

“यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घेताना मूळ प्रमाणपत्रे स्वत:कडे ठेवता येणार नाहीत. प्रवेशादरम्यान महाविद्यालय बदलल्यास त्यांना शुल्कदेखील परत मिळणार आहे,’ असा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल घेतला. त्याचे शिक्षण क्षेत्रातून सर्वत्र स्वागत होत आहे. हा निर्णय स्तुत्य आहे, पण त्याची तितकीच अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली आहे.

भारतीय इलिजिबल स्टुडंट टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अजय दरेकर म्हणाले, केंद्र सरकारने अतिशय योग्य आणि विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. मूळ कागदपत्रावरून विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा संस्थेकडून कोणताही प्रयत्न होणार नाही. इतकेच नव्हे, तर या कारणावरून काही संस्थांकडून विद्यार्थ्यांचे होणारे शोषणही बंद होतील.

विद्यार्थी व पालकांना दिलासा देणार निर्णय आहे. यामुळे विशेषत: विनाअनुदानित संस्थांकडून विद्यार्थ्यांची शुल्कावरून अडवणूक करणाऱ्या प्रकाराला पायंबद बसेल. वर्षभराऐवजी सेमिस्टरनिहाय शुल्क भरण्याची मुभा आहे. त्यामुळे पालकांना शुल्काचा भार पडणार नाही. प्रवेश रद्द करतानाही सर्व रक्‍कम मिळणार असल्याने हा निर्णय स्वागतार्ह आहे.
– ए. पी. कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ.


शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ऐन प्रवेशाच्या वेळी एखाद्याचे विद्यार्थ्यांचे कागदपत्र गहाळ झाली असेल, तर त्याला स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रावरून प्रवेश घेणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असून, त्यानुसार शिक्षणसंस्थांनी तितकाच प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे.
– महेश बढे, स्पर्धा परीक्षा उमेदवार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)