केंद्राच्या ऑनलाईन फार्मसीबाबत चर्चासत्र

पुणे, दि.27 – केंद्र सरकारने ऑनलाईन फार्मसी अर्थात ई-फार्मसीने रुग्णांना औषधी मिळावीत यासाठी नवीन नियमावली तयार केली असून नागरिकांना त्यावर सूचना व हरकतीही पाठविण्याचे आवाहन केले आहे. या ऑनलाईन फार्मसीमुळे ग्राहकांना औषधी स्वस्त मिळणार का, त्याचा नक्‍की काय फायदा होणार या सारख्या बाबींबरोबरच त्याचे समाजावर काही घातक परिणाम होणार का अशा सर्वच बाबींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या दृष्टीने सजग नागरिक मंचाच्या मासिक सभेत 7 जुलै रोजी बीएमसीसी रस्त्यावरील आयएमडीआर संस्थेच्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. अनंत फडके, भारती विद्यापीठ फार्मसी विभाग प्रमुख डॉ. आत्माराम पवार तसेच केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी विजय चंगेडिया हे सहभागी होणार आहेत, अशी माहिती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)