केंदूरमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याला 5 हजार रुपये दंड

शिक्रापूर – केंदूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे तीन वर्षापूर्वी कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी के. बी. बिबे यांनी वेळेत माहिती दिली नाही म्हणून त्यांना 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसूल करण्याचे आदेश देखील राज्य माहिती आयुक्तांनी दिले आहेत.

केंदूर (ता. शिरूर) येथे तीन वर्षापूर्वी ग्रामविकास अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी म्हणून के. बी. बिबे हे कार्यरत होते. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक शंकर शिंदे यांनी एक माहिती मागविली होती. परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी माहिती वेळेत दिली नाही.त्याबाबत माहिती वेळेत पुरविली नाही म्हणून 5 हजार रुपयांचा दंड का ठोठाऊ नये? अशी विचारणा राज्य माहिती आयुक्त कार्यालयाकडून केली होती. त्यांनतर ग्रामविकास अधिकारी के. बी. बिबे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे उपस्थित न राहता याबाबत खुलासा देखील केला नाही, असे राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी सांगितले आहे. बिबे यांना 5 हजार रुपये दंड ठोठावल्याची माहिती या प्रकरणातील अपिलार्थी असलेले मुख्याध्यापक शंकर शिंदे यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)