शिक्रापूर-केंदूर (ता. शिरूर) येथील एका शेतकऱ्याने कांदा विक्री केल्यानंतर कांद्याचे आलेले पैसे व त्यांच्या मुलाने त्यांच्याजवळ ठेवलेले पैसे असे एकूण सव्वा लाख रुपये रात्रीच्या सुमारास चोरट्याने चोरून नेले असल्याचा प्रकार आज पहाटेच्या सुमारास घडला आहे.
याबाबत पंडित नामदेव ताठे (रा. तवलीबेंद, केंदूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंडित ताठे यांना काही दिवसांपूर्वी कांदे विक्रीतून 95 हजार रुपये मिळाले होते. ते पैसे त्यांनी देवघराच्या खोलीतील बाजरीच्या पोत्यामध्ये ठेवले होते आणि अधूनमधून पंडित हे पैशाची पाहणी देखील करीत होते. त्यानंतर त्यांच्या मुलगा ज्ञानेश्वर याला खरेदीखतातून तीस हजार रुपये मिळाले होते, ते पैसे त्याने घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते. तर घरामध्ये वडील व मुलाने ठेवलेले असे एकूण सव्वा लाख रुपये ठेवलेले होते. तर गुरुवारी रात्री सर्वजण जेवण करून शेजारील घरामध्ये झोपले होते. त्यानंतर आज सकाळी पंडित ताठे हे उठून घरात गेले असता त्यांना घरातील कपाट उघडे तर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी पहिले असता त्यांना खिडकीचे गज तुटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नी, मुलगा व सुनेला आवाज दिला आणि घरामध्ये पाहणी केली असता त्यांना घरामध्ये बाजरीच्या पोत्यात ठेवलेले 95 हजार रुपये व मुलाने कपाटामध्ये ठेवलेले तीस हजार असे सव्वा लाख रुपये चोरी गेले असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)