कॅश व्हॅन लुटली; लुटारूंच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली – हरियाणाच्या सीमेलगत असणाऱ्या दिल्लीच्या नारेला परिसरात आज लुटारूंनी कॅश व्हॅन लुटली. यावेळी लुटारूंनी केलेल्या गोळीबारात रोकड घेऊन जाणारे दोघे मृत्युमुखी पडले.

लुटीची ही घटना भरदुपारी घडली. एका वाईन शॉपची रोकड घेऊन जाण्यासाठी कॅश व्हॅन दाखल झाली तेव्हा तिथे दुचाकीवरून तीन लुटारू पोहचले. त्यांनी चेहरा दिसू नये यासाठी हेल्मेट परिधान केले होते. व्हॅनजवळ रोकड घेऊन पोहचलेले कॅशियर रजनीकांत आणि सुरक्षारक्षक प्रेमकुमार यांच्यावर लुटारूंनी बेछूट गोळीबार केला. त्यानंतर सुमारे बारा लाख रूपये रोकड घेऊन लुटारू पसार झाले.

दरम्यान, कॅशियर आणि सुरक्षारक्षकाचे रूग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. लुटीची घटना हरियाणा सीमेलगत घडल्याने लुटारू हरियाणामधील असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेच्या दोन दिवस आधीच दिल्लीच्या रोहिणी परिसरात कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, सतर्क कॅशियर आणि सुरक्षारक्षकाने तो प्रयत्न उधळून लावला होता. मात्र, लुटारूंनी केलेल्या गोळीबारात ते दोघेही जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)