कॅशलेस व्यवहारांत होत आहे वाढ

नवी दिल्ली – 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने घोषित केलेल्या नोटबंदीला आता बराच काळ लोटला आहे. या काळात कॅशलेस व्यवहारामध्ये 60 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. हा व्यवहार डेबिट-क्रेडिट कार्डच्या वापरातून झालेला आहे. ही माहिती रिझर्व्ह बॅंकेने सादर केलेल्या अहवालात दिली आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये 67 कोटी 15 लाख इतके कॅशलेस व्यवहार करण्यात आले होते. या आकडेवारीवरून आर्थिक व्यवहार करण्याच्या नागरिकांच्या पारंपरिक सवयीमध्ये दिवसेंदिवस सकारात्मक बदल घडून येत आसल्याचे पाहावयास मिळत आहे. या संपूर्ण आकडेवारीतून असे समजते की लोकांचा कॅशलेश व्यवहार करण्याकडे ओढा वाढत असल्यांचे समजते. यावर अर्थखत्याने समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)