कॅलिफोर्निया बारमधील गोळीबारात बंदूकधाऱ्यासह 13 ठार 

संग्रहित छायाचित्र

लॉस एंजेलिस (अमेरिका) – कॅलिफोर्नियातील एका बारमध्ये गोळीबाराची घटना घडली. झालेल्या गोळीबारात बंदूकधाऱ्यासह 13 जण ठार झाले असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. लॉस एंजेलिसपासून सुमारे 40 किमी दूर असलेल्या बॉर्डरलाईन बारमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली.

बंदूकधाऱ्याने सेमी ऑटोमॅटिक बंदुकीतून 30 गोळ्या झाडल्याची आणि त्याच्या हातात हातबॉंब असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अंदाधुंद गोळ्या झाडायला सुरुवात करण्यापूर्वी त्याने एक स्मोकबॉंबही फेकला. तेथे असलेल्या लोकांनी त्याच्या अंगावर खुर्च्या फेकून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)