कॅलिफोर्निया आगीतील मृतांची संख्या 81 वर 

लॉस एंजेलिस – कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागातील जंगलात लागलेल्या वणव्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 81 वर पोहोचली आहे. या आगीची अनेकांना झळ बसली असून हजारो नागरिक बेपत्ता आहेत. हा वणवा विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाऱ्यामुळे आग आटोक्‍यात आणण्यात अडथळा निर्माण होत आहे. कॅलिफोर्नियामध्ये लागलेली ही आतापर्यंतची सर्वांत जास्त विनाशकारी आग ठरली आहे
.
आगीमुळे जंगलांसह घरे, वाहने बेचिराख झाली असून मृतदेहांचा शोध घेणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे बेपत्ता असलेल्या नागरिकांची संख्या गेल्या काही दिवसांत सातत्याने बदलत आहे. या आगीमध्ये आतापर्यंत एकूण एक लाख 52 हजार एकर जमीन आणि 12 हजार 600 घरे बेचिराख झाली आहेत.

आग विझविण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात फवारा करण्यात येत असून या आठवड्याअखेरपर्यंत आग विझण्याचा अंदाज आहे. मात्र, पाण्याच्या मोठ्या वापरामुळे राखेचा मोठ्या प्रमाणात चिखल होण्याची आणि काही मृतदेहांचे अवशेष वाहून जाण्याचीही भीती आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)