कॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर 

पॅराडाईस: उत्तर कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीत आणखी तेरा जणांचे बळी गेल्याने या आगीत मरण पावलेल्यांची संख्या आता 42 वर गेली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेत एखाद्या जंगल परिसराला इतक्‍या मोठ्या प्रमाणात आग लागल्याची ही पहिलीच घटना आहे.

या आगीने त्या परिसरातील मानवी वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेकांच्या गाड्या, घरे आणि अन्य मालमत्ता जळून खाक झाल्या आहेत. गेले चार दिवस ही आग धुमसत असून त्याचा फटका 27 हजार गावांना बसला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जंगलात वणवा भडकण्याची मोठी घटना 1933 मध्ये लॉस एंजल्सच्या ग्रिफिथ पार्क परिसरातील जंगलात घडली होती. त्यात एकूण 29 जणांचे बळी गेले होते. त्यानंतर आगीचे हे भयानक तांडव उत्तर कॅलिफोर्नियाने प्रथमच अनुभवले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)