कॅलिफोर्नियामध्ये स्वैर गोळीबारात 5 जण ठार

लॉस एंजेलिस – कॅलिफोर्नियमध्ये बुधवारी एका व्यक्‍तीने केलेल्या बेछुट गोळीबारामध्ये 5 जण ठार झाले. मृतांमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्‍तीच्या पत्नीचाही समावेश आहे. या गोळीबारानंतर या बंदुकधाऱ्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलिसांच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.

बेकर्सफिल्ड शहरात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकूण 6 जण मरण पावले आहेत, असे केम प्रांताच्या शेरीफ कार्यालयाचे लेफ्टनंट मार्क किंग यांनी सांगितले. या घटनेमागे कौटुंबिक हिंसाचारचे कारण असल्याचे समजले जात आहे. मोठी हॅन्डगन घेतलेल्या एका व्यक्‍तीने हा गोळीबार केला होता. एकूण 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, असेही या प्रवक्‍त्याने सांगितले.

अमेरिकेमध्ये सार्वजनिक ठिकाणच्या सामूहिक हत्या प्रकरणातील हे सर्वात अलिकडचे प्रकरण आहे. अमेरिकेत नागरिकांना रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा अधिकार असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराला विरोधही मोठ्या प्रमाणावर होतो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)