कॅलिफोर्नियातील वणव्यात हॉलिवूडच्या लोकेशनची राखरांगोळी 

लॉस एंजेलिस – कॅलिफोर्नियात पसरलेल्या वणव्यामध्ये ऍगोरा हिल्स परिसरातील पॅरामाऊंट रांचच्या पश्‍चिमेकडील भागातील निसर्गरम्य ठिकाणांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. हा भाग हॉलिवूडच्या सिनेमांच्या चित्रीकरणासाठी लोकप्रिय लोकेशन म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरामध्ये पसरलेल्या वणव्यामुळे हॉलिवूडच्या काही चित्रपटांचे सुरू असलेले शुटिंगही थांबवण्यात आले असून कलाकार, तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांना तेथून तातडीने निघून जावे लागले आहे. सॅन्टा मोनिका माऊंटन्स नॅशनल रिक्रिएशन एरियाने ट्‌विटरवर ही माहिती दिली आहे.

वेर्स्ट वर्ल्ड या फिल्म प्रॉडक्‍शन कंपनीच्यावतीने सध्या पॅरामाऊंट रांच या भागात कोणतेही शुटिंग सुरू नव्हते. त्यामुळे तेथील प्रॉडक्‍शन साहित्याचे किती नुकसान झाले, हे समजू शकलेले नाही, असे “एचबीओ’च्यावतीने सांगण्यात आले आहे.
या वणव्यामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे आणि किमान 35 जण बेपत्ता झाले आहेत. पॅरामाऊंट रांचच्या जवळपासच्या भागात वणवा वेगाने पेटल्याने तेथील रहिवाशांना कारसह निघून जाण्यासही वेळ मिळाला नाही.

-Ads-

बंद पडलेल्या कारमध्ये गुदमरून काही जणांचा अंत झाला. रस्त्यावर अनेक वाहने बेवारस स्थितीमध्येच सोडून देण्यात आली आहेत. ही वाहने नंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याशिवाय किमान 6 हजार 700 घरे आणि उद्योगांची ठिकाणे जळून खाक झाली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)