कॅम्पमध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न : लष्कर पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे- एकमेकांकडे बघण्याचा कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांनी पालघनने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 19 सप्टेंबर) सायंकाळी 5.30 वाजता कॅम्प येथील ठक्कर को-ऑपरेटीव्ह सोसायटी येथील एका मोबाईल दुकानासमोर घडली.
याबाबत परवेज पटवेकर (वय 27, रा. गुरूवार पेठ) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लष्कर पोलिसांनी पाच जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (भारतीय दंड संहिता 307) आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या पूर्वी दोन दिवस कोंढवा येथे एकामेकांकडे बघण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी मित्र फैजल अन्वर शेख याचेसह कॅम्पमध्ये मोहरम ताबूत बघण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाच जणांनी जर्कीन पकडून, त्यांच्याजवळ असणाऱ्या लोखंडी पालघनने फिर्यादींच्या डोक्‍यावर, हातावर आणि पायावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)