कॅमोइंफार्मेटिक्‍स मध्ये करा करिअर

सायनशास्त्रात तंत्रज्ञानाचा वारंवार वापर होत आहे. या अंतर्गत रासायनिक माहिती, आकडेवारी, विश्‍लेषण आणि प्रश्‍नांचे निरसन या विषयीचे एकत्रित काम होते. या सर्व प्रक्रियेला कॅमोइंफॉर्मेटिक्‍स असे नाव दिले आहे. तसं पाहायला गेले तर कॅमोइंफर्मेटिक्‍स हा बायोलॉजी विज्ञानाचाच एक भाग आहे.

प्रमुख संस्था
जामिया हमदर्द जागतिक विद्यालय, नवी दिल्ली.
शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ
फार्मेसी ऍण्ड टेक्‍नॉलॉजी मॅनेजमेंट, मुंबई.

जेव्हा एखादा रासायनिक शोध लागतो त्यावेळी अनेक माहिती, आकडेवारी मिळविली जाते. ही सर्व माहिती व्यवस्थित साठवून त्याचे विश्‍लेषण करणे आवश्‍यक असते.रासायनिक प्रक्रियेदरम्यान संयुगांचे अखंड संशोधन, संश्‍लेषण केले जाते. यातून प्रचंड आकडेवारी जमा होते. रासायनिक माहितीच्या या सातत्याने वाढणाऱ्या आकडेवारीला रासायनिक माहितीचा विस्फोट असे म्हटले जाते. या मोठ्या रासायनिक माहितीचे व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. यामध्ये विज्ञान महत्वाची भूमिका बजावते. रासायनिक माहितीच्या विज्ञानात रासायनिक संयुगांची गणिते, आण्विक माहिती आणि संग्रहाचे निकष लावले जातात.

-Ads-

कॅमोइन्फर्मेटिक्‍सचा सर्वाधिक उपयोग औषधे विकसित करणाऱ्या कंपन्यांना होतो. या कंपन्यांना विविध रोगांवरची औषधे शोधण्यास, निर्मितीस ही माहिती उपयोगी पडते. औषधांचे संशोधन ही खूप अवघड आणि वेळ लागणारी प्रक्रिया आहे. या औषधांचे लक्ष्य जैविक प्रभाव उत्पन्न करण्यासाठी रासायनिक औषधे तयार करणे असा असतो. औषधांचा शोध आणि निर्मिती प्रक्रिया करताना संशोधकाला जैविक प्रणालीवर होणाऱ्या परिणामांचे परीक्षण करावे लागते. त्या औषधांमार्फत अपेक्षित प्रभाव होतो का हे पाहिले जाते. अपेक्षित परिणाम झाला तरच त्याला रासायनिक शोध मानले जाते. पूर्वी एका रासायनिक संयुगाशी निगडित पुस्तके एकत्रित केली जात. संशोधक ते सातत्याने वाचत. आता मात्र कॅमोइंफॉर्मेटिक्‍सच्या मदतीने औषध निर्मिती सुलभ झाली आहे. आता औषध निर्मिती केवळ एक प्रतिक्रियांची कल्पना राहिलेली नाही. उच्च संगणकीय सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यातील गुणदोष त्वरित पाहता येतात.

रसायनशास्त्र आणि माहितीतंत्रज्ञानाशी संबंधित असल्याने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी रसायनशास्त्रात कमीत कमी बीएससी उत्तीर्ण असावेत. बीएससी झाल्यानंतरच कॅमोइन्फर्मेटिक्‍स आणि एमएससी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. कॅमोइन्फर्मेटिक्‍समध्ये एमएससी करण्यासाठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात जाण्याचा मार्ग सुकर होतो. देशात अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी मिळविल्यानंतर एक वर्षाचा पदविका अभ्यास, पीजी डिप्लोमा यासारखे अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमांचा कालावधी एक वर्षापासून दीड वर्षापर्यंत असतो.

कॅमोइन्फर्मेटिक्‍समध्ये एमएससी अंतर्गत विशेष प्राधान्याने डेटा बेस प्रोग्रॅमिंग, वेब टेक्‍नॉलॉजी, डेटा मायनिंग, डेटा कलेक्‍शन, सॅम्पलिंग आणि कम्युटरद्वारे ड्रग्ज डिझायनिंग इत्यादींचा समावेश असतो. अभ्यासक्रमादरम्यान काही विद्यार्थी प्रायोगिक प्रशिक्षण आणि व्यवस्थापनासबंधी काम करत असतात. पीएचडीसारख्या अभ्यासक्रमांमध्येच संशोधन, औषधांचा शोध, डिझायनिंग आणि त्याच्या कंपोझिशनचा अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे रसायनशास्त्र हळूहळू संगणकावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

कॅमोइन्फर्मेटिक्‍सच्या क्षेत्रात इच्छुक विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राची, संगणकीय कौशल्यांची प्रचंड आवड असावी लागते. संशोधनाच्या कामाविषयी देखील उत्साह असावा लागतो. त्या विद्यार्थ्याला माहिती-तंत्रज्ञान विषयांची उत्तम जाण असावी. याशिवाय आपल्याकडील माहिती पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा आत्मविश्‍वास हवा. या क्षेत्रात एकाच विषयाचे भरपूर प्रकल्प, सतत संशोधनाचे काम करावे लागते. अशा परिस्थितीत धैर्य हा एक गुण अंगी असावा लागतो.
गेल्या काही वर्षांत कॅमोइन्फर्मेटिक्‍समध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहेत. विशेषत: फर्मास्युटिकल, ऍग्रोकेमिकल आणि बायोटेक्‍नोलॉजी क्षेत्रात तज्ज्ञ, प्रशिक्षित उमेदवारांची मोठी कमतरता भासत आहे.

कॅमोइंफर्मेटिक्‍समध्ये एमएससी करणारे विद्यार्थी सुरुवातीला रसायनशास्त्र माहिती शास्त्रज्ञ, कम्प्युशनल केमिस्ट, केमिकल डेटा सायंटिस्ट, सिनिअर इंफॉर्मेशन ऍनालिस्ट, इंफॉर्मेशन ऑफिसर, डेटा ऑफिसर, सॉफ्टवेअर टेस्टर, सपोर्ट ऍनालिस्ट, बिजनेस ऍनालिस्ट अशा पदांसाठी काम करू शकतात. फार्मास्युटिकल, केमिकल इंडस्ट्री, आयटी, कम्प्युटर सॉफ्टवेअर सेक्‍टर, हॉस्पिटल, हेल्थ केअर, संशोधनाच्या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत.

प्रशिक्षितांना सुरुवातीला 15-25 हजार मासिक असे उत्पन्न मिळू शकते. अनुभव गाठीशी जमल्यावर ही रक्कम 35 ते 50 हजार रुपये प्रति महिना इथपर्यंत पोहोचते. मुक्तपणे काम करणाऱ्यांना रोजच्या कामानुसार पैसे आकारले जातात.

– समृद्धी पुरंदरे

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)