कॅबने ठोकरल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

कॅबने ठोकरल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
ट्रीपल सीट चालवत होते दुचाकी
पुणे,दि.13- भरधाव कॅबचालकाने ठोकरल्याने दुचाकीवर ट्रीपल सीट चाललेल्या पैकी एकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री डेक्कन येथील झाशी राणी चौकात घडली. यामध्ये कॅब चालकही जखमी झाला आहे.
रोहित कुमार (20,रा.वाकड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॅब चालक जमीर वलीसाब शेख(29,रा.येरवडा ) याच्याविरुध्द डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीर हा त्याची कॅब घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने झाशी राणी चौकातून चालला होता. यावेळी ट्रीपल सीट जाणाऱ्या दुचाकीला कॅबने ठोकरले . या अपघातात दुचाकी चालवणारा रोहित कुमार जागेवर ठार झाला तर फिर्यादर असलेला त्याचा भाचा चिंटु कुमार व किशोर मन्यम हे दोघे जखमी झाले. मृत व जखमी हे तिघेही एका हॉटेमध्ये काम करतात. हॉटेलमधील काम संपवून ते ट्रीपल सीटी घरी निघाले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाय.बी.शिंदे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)