‘कॅब’चालकांचा आज संप

राज्यभरात आंदोलन 


व्यवसाय घटल्याचा दावा

पुणे- व्यवसायात झालेली घट आणि कंपन्यांकडून काळ्या यादीत टाकल्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील ओला, उबेर चालक आज(सोमवार) संपावर जाणार आहेत. पुणे शहरात 20 हजारच्या आसपास कॅब चालक आहेत. यामुळे कॅबने प्रवास करणाऱ्यांची अडचण होणार आहे.

रिक्षा, टॅक्‍सी व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे इतके दिवस चांगला चाललेला कॅब चालकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर घटला आहे. यातच उत्पन्नात घट झाल्याने कंपन्यांनी गाड्यांना काळ्या यादीत टाकले आहे. यामुळे हजारो कॅब चालक त्रस्त झाले आहेत. ओला, उबेरला गाड्या लावण्यासाठी अनेकांनी कर्ज काढली आहेत. या कर्जाची परतफेडी झाली नाही. तोवर गाड्या कंपन्यांकडून काळ्या यादीत टाकण्यात आल्या आहेत. यावर अनेक तरुणांचा रोजगार अवलंबून होता. राज्यपातळीवर होणाऱ्या ऑफलाइन आंदोलनात पुण्यातीलही कॅब चालक सहभागी होणार आहेत. या संपामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन रिक्षा चालकांनी भाडे नाकारू नये तसेच मीटरप्रमाणे भाडे घ्यावे, असे आवाहन आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोठ्या उत्पन्नाचा दावा फोल
कंपन्यांनी सुरवातीला प्रतिमहिना दीड लाख रुपयांचे उत्पन्न निश्‍चत मिळेल, असे आकर्षण दाखवले होते. तसेच वाहन घेण्यासाठी अनेक ठिकाणी मेळावेही होत होते. यामुळे बेरोजगार तरुणांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून वाहने घेतली आहेत. प्रत्यक्षात दरमहा 15 ते 16 हजारच मिळत असल्याने कर्ज फेडणेही मुश्‍किल झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)