कॅप्टन अमरिंदरसिंगांनी घेतली गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट

नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन, पंजाबमध्ये वाढत असलेल्या दहशतवादी कारवायांबाबत चिंता व्यक्त केली. या वेळी झालेल्या बैठकीत ते म्हणाले, राज्यात दहशतवादी डोके वर काढत आहेत. यामुळे तिथे शांततेला धोका निर्माण झाला असून, गेल्या दीड महिन्यांपासून लोकांचे हत्याकांड सुरु आहे. दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांत मीडियासमोर काही फोटो आले होते, त्यात हाफिज सईद शीख दहशतवादी नेता गोपालसिंग चावलासोबत दिसत आहे.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग पुढे बोलताना म्हणाले की, गुप्तचर यंत्रणेला अधिक मजबूत करण्याबरोबरच कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, इटली आणि जर्मनी येथे भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांवरही कारवाई करणे गरजेचे आहे.विदेशात राहून हे लोक पंजाबविरोधात कारवाया करत आहेत. तसेच राज्यातील शांततेला आव्हान निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्टलाही आवर घालण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हंटल.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)