कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रुग्णांसाठी आवश्यक असणारी कॅन्सर प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय, महाराष्ट्र शासन मुंबई, आमदार उल्हासदादा पाटील युथ फाऊंडेशन,रोटरी लायन्स, इनरव्हील क्लब, तालुक्यातील तरुण मंडळे तसेच सर्व सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नृसिंहवाडी येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार उल्हास पाटील, मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्ष प्रमुख, डॉ. ओमप्रकाश शेटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, तहसिलदार गजानन गुरव, समन्वयक राजेश सोनार, विकास पुजारी, अनिल यादव  आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरोळ तालुक्यात कॅन्‍सर रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक असून, याबाबत आवश्यक प्रतिबंधक उपाय आणि जनजागृती करण्यास प्राधान्य दिला  जाईल, असे सांगून  पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रुग्णांची तपासणी आणि प्रभावी जागृतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 28 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला असून, यापुढील काळात मागेल त्याला  कॅन्सर प्रतिबंधक लस  देऊन  कॅन्सरला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)