कॅन्टोन्मेट कल्चरल संघातर्फे अभिवादन सभा

पुणे – आंबेडकर कल्चरल संघातर्फे अरोरा टॉवर जवळील आंबेडकर पुतळ्याजवळ आज त्यांच्या जयंती निमीत्त अभिवादन सभा घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे हे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना खोरे यांनी आंबेडकर यांनी देशाच्या घटना निर्मीती कार्यात दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून सांगितले की देशात बहुमतवाल्यांनी अल्पमतवाल्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असे आंबेडकर नेहमी म्हणत पण आज देशात बहुमताच्या जोरावर लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत. आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हते.

कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण, भीमा कोरगाव प्रकरण इत्यादी प्रकरणातून देशात महिला व दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या प्रकरणावर न्याय मिळायला होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बापू गानला, पार्वती भडके, रमेश जांभुळकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले तसेच कॅन्टोन्मेट बोर्डाचे विद्यमान पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)