कॅनॉल दुरुस्तीचे 5 कोटी रुपये गेले कुठे?

पुणे – बेबी केनॉल दुरुस्तीसाठी दिलेल्या 14 कोटी रुपयांमधील 5 कोटी रुपये गेले कोठे, याची चौकशी करण्याची मागणी स्वयंसेवी संस्थेने केली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनाही त्यांनी पत्र पाठवून दुरुस्तीसंदर्भात बेजबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेने मैला पाणी शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेले पाणी मुंढवा जॅकवेलमधून बेबी कॅनॉलमध्ये सोडल्यानंतर ते पाणी पाटबंधारे खात्याकडून उचलले जात नाही. ही ओरड आहेच, परंतु हे पाणी ज्या कॅनॉलमध्ये सोडले जाते तो कॅनॉलच अनेक ठिकाणी फुटला असून त्याची दुरवस्था झाली आहे. याविषयी जलसंपदा विभागालाही छायाचित्रांसह कळवण्यात आले होते. तसेच चर्चाही झाली होती, असे तक्रारदार असलेल्या “सजग नागरिक मंच’ या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2016 मध्ये राज्य सरकारने बेबी कॅनॉल दुरुस्तीसाठी 14 कोटी रुपये जलसंपदा विभागाला दिले होते. या पैशांचा विनियोग नक्की कसा झाला, याचा तपशील आणि आदेश देऊनही 14 कोटी रुपयांच्या निधीमधून काय कामे झाली आहेत, याचे तपशील जलसंपदा विभागाने राज्यसरकारला अजूनही दिले नसल्याचे या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

या प्रकारानंतर जलसंपदा विभागाकडे माहिती अधिकारात माहिती मागवली असता, जलसंपदा विभागाने दोन वर्षांत 14 कोटी रुपयांपैकी 9 कोटी रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब समोर आली. मात्र एवढे पैसे खर्च झाले असले, तरी कालव्याची दुरुस्ती मात्र झाली नाही. त्यामुळेच या कॅनॉलमध्ये मुंढवा जॅकवेलमधून दोन वर्षांत दररोज 550 एमएलडी ऐवजी 350 एमएलडी पाणी सोडले जात आहे, असे या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच परंतु धरणातून शेतीसाठी जास्त पाणी सोडल्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. याला जलसंपदा विभागाचा बेजबाबदारपणा आणि नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)