कॅनरा विद्या ज्योती योजनेचा उपक्रम स्तुत्य 

वाठार – ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कॅनरा बॅंकेने सुरु केलेली कॅनरा विद्या ज्योती योजना सामाजिक बांधिलकी जोपासणारी आहे. बॅंकेच्या या उपक्रमातून गत पाच वर्षापासून मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. कॅनरा बॅंकेच्या विद्यार्थी सहाय्य उपक्रमास ग्रामीण भागातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती कॅनरा बॅंकेचे शाखा प्रबंधक सुधीर पाटील यांनी दिली.

कासारशिरंबे, ता. कराड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कॅनरा विद्या ज्योती उपक्रमांतर्गत मागासवर्गीय मुलींना आर्थिक मदत वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हनुमान पाणीपुरवठा योजनेचे व्हा. चेअरमन भास्कर पवार होते. कॅनरा बॅंकेच्या अधिकारी खूशबू, कृषी अधिकारी स्वाती कदम, बाळकृष्ण मोहिते, मुख्याध्यापक जीवन मोहिरे, संदिप यादव, शिल्पा गोतपागर, प्रमोद थोरात, प्रविण कचरे, नारायण सातपुते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-

कॅनरा बॅंक कराड शाखेच्यावतीने गेली पाच वर्षापासून कॅनरा विद्या ज्योती हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत दरवर्षी ग्रामीण भागातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातील एका मागासवर्गीय मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते.

यंदा कासारशिरंबे येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील प्रिती गायकवाड, स्नेहा गायकवाड, अंकिता माने या विद्यार्थीनींना प्रत्येकी अडीच हजार रूपये तसेच निलिमा माने, ज्योती माने, अश्विनी गायकवाड या विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रूपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामुळे मागासवर्गीय मुलींना शिक्षणासाठी नक्कीच प्रेरणा मिळत आहे. या उपक्रमाचे ग्रामीण भागातून कौतुक होत आहे. प्रास्ताविक जीवन मोहिरे यांनी केले. बाळकृष्ण मोहिते यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले. महेश सावंत यांनी सुत्रसंचालन केले, शिल्पा गोतपागर यांनी स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)