कॅनरा बॅंक फसवणूकप्रकरणी माजी सीएमडीविरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली – सीबीआयने कॅनरा बॅंकेचे माजी चेअरमन-कम-मॅनेजिंग डायरेक्‍टर (सीएमडी) आर.के.दुबे आणि इतर काही जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. तब्बल 68 कोटी रूपयांचे कर्ज बुडवल्याशी संबंधित फसवणूक प्रकरणी हे पाऊल उचलण्यात आले.

हिरे, सोने-चांदी दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या ऑकेजन सिल्व्हर प्रा.लि. कंपनीला 2013 मध्ये कॅनरा बॅंकेने 68 कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले. हे कर्ज बुडीत ठरले. कंपनीचे संचालक कपिल गुप्ता आणि राजकुमार गुप्ता यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून कर्ज मिळवले आणि घोटाळा केला. दुबे यांच्याशी असलेल्या ओळखीचा लाभ उठवून गुप्तांनी कर्ज मिळवल्याचे चौकशीतून उघड झाले. याप्रकरणी सीबीआयने जानेवारी 2016 मध्ये गुन्हा दाखल केला.

आता दुबे आणि गुप्ता यांच्याविरोधात विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात फसवणुकीबरोबरच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. अशोककुमार गुप्ता, व्ही.एस.कृष्णकुमार, मुकेश महाजन, टी.श्रीकांतन आणि उपेंद्र दुबे या बॅंकेच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)