कॅनरा बॅंकेच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

नारायणगाव- कॅनरा बॅंक, (नारायणगाव) यांच्या वतीने विद्या ज्योती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती वाटपाचे आयोजन येडगाव (इंदिरानगर) येथे करण्यात आले, अशी माहिती कॅनरा बॅंक नारायणगाव शाखेच्या व्यवस्थापक सुरभी तामरकर यांनी दिली. येडेश्वर विद्यामंदिर, येडगाव या शाळेतील अनुसूचित जाती व जमातीच्या (एससी, एसटी) प्रवर्गातील गुणवंत मुलींना 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण संपादन केल्याने त्यांना बॅंकेच्या वतीने शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. शिष्यवृत्तीच्या स्वरूपात 5 वी ते 7 वी पर्यंतच्या गुणवत्ता मिळालेल्या मुलींना अडीच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच आठवी ते नववीच्या मुलींना पाच हजार रुपये देण्यात आले. यामध्ये दिव्या विठ्ठल खंडागळे, काजल विजय मधे, मनीषा बाळू सूर्यवंशी, प्रगती संतोष शेलार या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली. यावेळी कॅनरा बॅंक व्यवस्थापक सुरभी तामरकर, येडेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सीताराम सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भिसे, रंजन शेट्टी, सोमा दाते, अक्षय साठे आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष अभंग, तर आभार सुरेश कसार यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)