कॅनडात नोकरीच्या आमिषाने गंडा

पिंपरी – कॅनडात नोकरी लावण्याच्या आमिषाने पिंपळे गुरवमधील एकाची तब्बल अडीच लाखांची फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी राघवेंद्र मनोहर ठाणे (वय-32, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी 8860811413 हा मोबाईलक्रमांकधारक महिला व एचडीएफसी बॅंक खातेदार नियाग्नेक कीम यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी राघवेंद यांच्या ई-मेलवर कॅनडाला नोकरी लावतो असे सतत मेल पाठवत त्यांचा विश्‍वास संपादन केला. यासाठी त्यांची कागदपत्रे तसेच व्हिसा साठी म्हणून नियाग्नेक कीम याच्या बॅंक खात्यावर 2 लाख 33 हजार भरण्यास सांगितले. मात्र त्यानंतर कोणताही प्रतिसाद त्यांनी दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राघवेंद्र यांनी पोलीस ठाणे गाठले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)