कॅनडातील भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट, १५ जण जखमी

टोरंटो : कॅनडातील ओंटारियो येथील एका भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट झाला. या स्फोटात १५ जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ओंटारियो येथे बॉम्ब भेल हे रेस्टॉरन्ट असून या रेस्टॉरन्टमध्ये गुरुवारी स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरुन गेला. हा दहशतवादी हल्ला आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाच्या काही वेळापूर्वी रेस्टॉरन्टमध्ये दोन तरुण संशयास्पद स्थितीत घुसले होते. त्या दोघांनी कापडाने चेहरा झाकला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)