कॅनडाच्या फ्रेडइरीटॉन शहरात गोळीबार…

4 जण ठार, अनेक जण जखमी
फ्रेडइरीटॉन – कॅनडाच्या पूर्व भागातील फ्रेडइरीटॉन शहरात गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये चार जण ठार झाले आहेत. अजूनही याभागात गोळीबार सुरु असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती फ्रेडइरीटॉन पोलिसांनी ट्‌विटरवरुन दिली आहे. या भागात गोळीबार सुरु असल्यामुळे नागरिकांनी मुख्य आणि रिंग रोडवरुन प्रवास करणे टाळावे तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन कॅनडा पोलिसांनी केले आहे.

-Ads-

2014 मध्ये न्यू ब्रन्सविकमध्ये झालेल्या गोळीबारात रॉयल कॅनडीयन माऊंटेड पोलीस दलाच्या तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि दोन जण जखमी झाले होते. फ्रेडइरीटॉन शहरात सध्या सुरु असलेला गोळीबार ही त्याच प्रकारचा गोळीबार असल्याची माहिती असून यामुळे अनेक जनजखमी झालेले आहेत. अमेरिकेच्या तुलनेत कॅनडात बंदुक बाळगण्यासंदर्भातील कायदे अत्यंत कठोर आहेत.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना सुद्धा इथे दुर्मिळ आहेत. पण अलीकडच्या काळात कॅनडामध्ये अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. मागच्या महिन्यात कॅनडातील टोरांटो शहरात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले होते तर 13 जण जखमी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)