कॅण्डी कसोटी:भारताचा पहिला डाव 487 धावांवर आटोपला

पल्लीकल : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव 478 धावांवर आटोपला. ऑल राऊंडर हार्दिक पंड्याच्या वादळी शतकाने भारताने 478 धावांपर्यंत मजल मारली. पंड्याने 96 चेंडूत 108 धावा ठोकल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या शिखर धवन आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. शिखर धवनने कारकीर्दीतील सहावे कसोटी शतक झळकावले. त्यानं 123 चेंडूत 17 चौकारांसह 119 धावांची खेळी उभारली.
लोकेश राहुलनंही 135 चेंडूत 8 चौकारांसह 85 धावा केल्या. राहुलचे हे सलग सातवे अर्धशतक होते. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारीही साकारली. धवन आणि राहुल बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारताचा डाव गडगडला. चेतेश्वर पुजारा 8 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने 13 तर आर अश्विनने 31 धावांचं योगदान दिलं. कर्णधार विराट कोहलीनेही 42 धावा करत संघाचा डाव सावरण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रिद्धीमान साहा 13 तर हार्दिक पंड्या 1 धावांवर खेळत होता. पंड्याने दुसऱ्या दिवशी जबरदस्त खेळी करत भारताला 487 धावांची मजल मारुन दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)