कॅडेन्स अकादमी, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे: कॅडेन्स अकादमी संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा तर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या संघाने पुना क्‍लब संघाचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

-Ads-

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात दिग्वीजय पाटीलच्या नाबाद 78 धावांच्या बळावर कॅडेन्स अकादमी संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा 105 धावांनी मोठा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना कॅडेन्स अकादमी संघाने 45 षटकात 5 बाद 259 धावा केल्या. यात मोहित दहिभातेने 43, अनिरूध्द साबळेने 33 व वेदांत जगदाळेने 31 धावा करून दिग्वीजयला सुरेख साथ दिली. 259 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना साहिल अभंगच्या 94 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व अरकम सय्यद व निलय सिंघवी यांच्या आक्रमक गोलंदाजीपुढे क्रिकेट मास्टर्स अकादमी संघ 45 षटकात 9 बाद 154 धावांत गारद झाला. अरकम सय्यदने 27 धावात 3 व निलय सिंघवीने 26 धावांत 2 गडी बाद केले तर प्रथमेश थिटे व दिग्वीजय पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. नाबाद 78 धावा व 1 गडी बाद करणारा दिग्वीजय पाटील सामनावीर ठरला.

पुना क्‍लब क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात भार्गव महाजनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पुना क्‍लब संघाचा 116 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना भार्गव महाजनच्या नाबाद 59 व शार्दुल विनोदेच्या 65 धावांसह व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 45 षटकात 8 बाद 248 धावांचा डोंगर रचला. 248 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओम भाबडच्या अफलातून गोलंदाजीपुढे पुना क्‍लब संघाचा डाव 45 षटकात 9 बाद 132 धावांत गुंडाळला. ओम भाबडने केवळ 14 धावा देत 5 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. नाबाद 59 व 1 गडी बाद करणारा भार्गव महाजन सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक
– साखळी फेरी
कॅडेन्स अकादमी- 45 षटकांत 5 बाद 259 (दिग्वीजय पाटील नाबाद 78, मोहित दहिभाते 43, अनिरूध्द साबळे 33, वेदांत जगदाळे 31, आर्यन पवार 1-15, पार्थ बोत्रे 1-28, रचीत वोरा 1-43, रोनक पारेख 1-17) वि.वि क्रिकेट मास्टर्स अकादमी- 45 षटकांत 9 बाद 154 (साहिल अभंग 94, पार्थ बोत्रे 19, अरकम सय्यद 3-27, निलय सिंघवी 2-26, प्रथमेश थिटे 1-26, दिग्वीजय पाटील 1-16) सामनावीर – दिग्वीजय पाटील

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी- 45 षटकांत 8 बाद 248 (शार्दुल विनोदे 65, भार्गव महाजन नाबाद 59, अर्चीसमन दास नाबाद 20, अभिजीत पवार 31, प्रसन्न पवार 18, अथर्व पंगारे 23, हर्षवर्धन पाटील 2-49, अभिषेक कुलकर्णी 2-27, ओम माळी 1-26, हृतिक उत्तेकर 1-39, अथर्व एकबोटे 1-58) वि.वि पुना क्‍लब- 45 षटकांत 9 बाद 132 (हर्षवर्धन टिंगारे नाबाद 38, श्रेयस गारमपल्ली नाबाद 24, ओम भाबड 5-14, ओंकार राजपुत 1-16, भर्गव महाजन 1-30,अर्चीसमन दास 1-19) सामनावीर- भार्गव महाजन

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)