कृष्ण आणि बलरामामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न

लालूपुत्र तेजप्रताप: कौटूंबिक यादवीचा केला इन्कार
पाटणा – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र तेजप्रताप यांनी कौटूंबिक यादवीचे वृत्त फेटाळून लावले आहे. धाकटे बंधू तेजस्वी यांच्याशी कुठले मतभेद नसल्याचे सांगताना त्यांनी कृष्ण आणि बलरामामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

तेजप्रताप काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. याशिवाय, नुकत्याच झालेल्या राजदच्या बैठकीत ते अनुपस्थित होते. त्यामुळे विविध तर्क-वितर्क लावणाऱ्या बातम्या बिहारमध्ये प्रसिद्ध होत आहेत. त्या राज्यातील सत्तारूढ जेडीयूने तर तेजप्रताप यांच्या अनुपस्थितीतून लालूंच्या कुटूंबातील मतभेदांचे संकेत मिळत असल्याचे म्हटले. लालूंनी धाकट्या पुत्राला राजकीय वारसदार बनवल्याने तेजप्रताप नाराज असल्याची चर्चाही रंगत आहे.

यापार्श्‍वभूमीवर, तेजप्रताप यांनी एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना कौटूंबिक मतभेदांचा इन्कार केला. मी यात्रेसाठी मथुरेला गेलो होतो. आजारी पडल्याने परतल्यावर मी विश्रांती घेतली. त्यामुळे राजदच्या बैठकीला उपस्थित नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्ष कौटूंबिक मतभेदांच्या अफवा पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

बिहारमध्ये जेडीयू, राजद, कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार असताना लालूंनी दोन्ही पुत्रांवर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. त्यावेळी झुकते माप मिळालेल्या तेजस्वी यांनी उपमुख्यमंत्रिपद सांभाळले. महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राजदमध्ये तेजस्वी यांच्याकडे अधिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)