कृष्णेच्या पैलतीरी पावकेश्वर वास करी

राजेंद्र मोहिते

करहाटक अर्थात कराड नगरीला ऐतिहासिक, धार्मिक व पौराणिक महात्म्याचा मोठा वारसा लाभला आहे. शेजारी वाहणाऱ्या कृष्णेच्या पैलतीरी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर नयनरम्य परिसरात सैदापूर येथे शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले पावकेश्वराचे मंदिर वसले आहे.
पावकेश्वर मंदिर हे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे आहे. मंदिराला चारही बाजूंनी तटबंदी आहे. तटबंदीच्या आत भिंतींमधे मळग्या बांधण्यात आल्या आहेत. यातील उगवतीच्या तटबंदीला भव्य प्रवेशद्वार असून त्यासमोर उंच दीपमाळ डौलात उभी आहे. दरवाजासमोर महानंदी असून त्यासमोर छोटेसे शिवलिंग, पादुका आणि दीप आहे. या नंदीवर पूर्वी मेघडंबरी असल्याच्या खुणाही दिसतात. मंदिराची उत्तरेकडील तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस एकूण चौदा मळग्या आहेत.
शिवकाळात या मंदिराचा उपयोग शेतसारा गोळा करण्यास, लष्करी छावणी वा एखाद्या सरदाराच्या वास्तव्यासाठी तर मळग्यांचा वापर घोडी बांधण्यासाठी होत असे. त्याकाळापासून मंदिराच्या तेलवातीसाठी पुजाऱ्यांना वतन म्हणून जमिनी देण्यात आल्या होत्या. अफझलखान वधानंतर महाराजांनी पन्हाळगड मोहिमेवर जाताना कराड प्रांतातील किल्ले वसंतगड आणि कराडचा भुईकोट काबीज केला होता.पावकेश्वर मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. शिखरावर देवदेवतांच्या सुबक मूर्ती आहेत. मंदिराचा मंडप सात मुख्य तर उपखांबांवर उभारला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणेश मूर्ती , गाभाऱ्यात भव्य शिवपिंडी आहे. श्रावणातल्या सरत्या सोमवारी श्री. पावकेश्वराची यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पडते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)